गरजूंना धान्य वाटप, मिठाई वाटप, अन्नदान

0
446

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – श्रमण संघीय युवाचार्य प.पु महेंद्रऋषीजी म.सा यांच्या ५५ व्या जन्मदिना निमित्त चिंचवडगावातील कल्याण प्रतिष्टान (सुखी भवन) येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले.

युवाचार्यजी चातुर्मास कार्यकाल निमित्त चिंचवड मध्ये वास्तव्यास आहेत. आठ दिवसांपासून तप, साधना व धार्मिक कार्यक्रम सुरू होते.बचपन से पचपन या माध्यमातून त्यांचा जीवनपट चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.रक्तदान शिबिर, सफाई कर्मचारी सन्मान,गरजूंना धान्य वाटप,मिठाई वाटप,अन्नदान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी जैन साधू हितेंद्र ऋषीजी म.सा. व साध्वी सन्मतीजी म.सा.,कंचनकवरजी म.सा, दिव्यजोतिजी,जागृतीजी म.सा.आदी संतगगण व संघाचे अध्यक्ष अशोक बागमार,कल्याण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुरेश सेठिया,संघाचे माजी अध्यक्ष दिलीप नहार,जैन कॉन्फरन्स अध्यक्ष पारस मोदी,उद्योजक आर.के.लुंकड,अभय संचेती,प्रा.अशोक पगारिया,विमल बाफना,रुचिरा सुराणा इंदोर व बेंगलोरहून आलेले धरमचंद चोरडिया,रमेश भंडारी,महेश डोकलिया,विर विशाल चे अध्यक्ष मयूर शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी देशातील विविध भागातून भक्तगण उपस्थित होते. युवाचार्यजींचा जयघोष करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तपस्विंचा विशेष सत्कार,धार्मिक तप ,आराधना कार्यक्रम संघाच्या वतीने घेण्यात आले.उगता सुरज या सप्तदिवसीय नाटिकेच्या माध्यमातून ऋषी मुनींचा जीवन प्रवास सादर केला.या प्रसंगी कलश बोली बोलण्यात आली.कलश चा लाभ रानी शिरीष भन्साळी, लताबाई अशोक बागमार,कमलेश राजेंद्र मुथा या परिवाराने घेतला.

महावीर की रोटी उपक्रमातुन पिंपरीत तिनशे जणांना अन्नदान करण्यात आले. हा उपक्रम नियमित सुरू आहे.हेमंत गुगळे,प्रशांत बरमेचा,आनंद मुथा यांनी या साठी योगदान दिले.

गौतम प्रसादीचा लाभ विजयाबाई पुखराज धोका परिवाराने घेतला.कार्यक्रम प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष अशोक बागमार यांनी केले.नंदकुमार लुनावत यांनी सूत्रसंचालन केले. कलश बोली प्रक्रिया मनोज बाफना यांनी केली. पिंपरी-चिंचवड शहरातील सकल संघाने योगदान दिले.कार्यक्रम आयोजना साठी संघाचे पदाधिकारी, सदस्य,महिला मंडळ व विर विशाल संघ यांनी सहकार्य दिले.