अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

0
485

सांगली, दि.२८ (पीसीबी) : अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकांत भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ८८ वर्षाचे होते. मूळचे सांगलीचे असणाऱ्या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिळवणारे ते भारततील पहिले खेळाडू होते. तसेच भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले होते.

नंदू नाटेकर यांनी अन्य खेळांमध्येही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट, टेनिसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी केली होती. भारतीय क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्यांमध्ये सर्वात आधी नंदू नाटेकर यांच नाव येते. ऑल इग्लंड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. १९६० च्या दशकात जाहिरात क्षेत्रातही त्यांनी मोठी मजल मारली होती. केसांना लावायच्या एका हेअर क्रीमची पहिली जाहिरात करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

नंदू नाटेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी १९५३ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरीच मोठी कामगिरी केली होती. १९५४ मध्ये, त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर ते या स्पर्धेत कधीही खेळले नाहीत. या स्पर्धेत तो पहिलाच आणि शेवटचा सामना ते खेळले. पण त्यांनी या स्पर्धेत व्हेटेरन्स प्रकारात खेळला आणि १९८०, १९८१ मध्ये दुहेरी प्रकार जिंकला आणि १९८२ मध्ये दुसरे स्थान मिळविले.

१९५१ ते १९६३ या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि १६ पैकी १२ सामने जिंकण्यात यशस्वी झाले होते. यावरून एकेरी स्पर्धांमध्ये त्यांच्यां खेळाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दुहेरी प्रकारात त्यांनी १६ पैकी आठ सामने जिंकले आणि १९५९, १९६१ आणि १९६३ मध्ये ते संघाचे कर्णधारही होते. त्यांनी पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकल्या होत्या. १९५६ मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित सेलंगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्यांनी जिंकली होती.