अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; विमानाचा आणि ड्रोनचा मोठा अपघात टळला

0
583

वॉशिंग्टन ,दि.१८ (पीसीबी) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचा मोठा अपघात टळला. वॉशिंग्टन विमानतळावर आकाशात उडणारी एक ड्रोन सदृश्य वस्तू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या अगदी जवळून गेली. ट्रम्प यांचं एअरफोर्स वन हे विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना हा भीतीदायक प्रकार घडला.

व्हाइट हाउसचं मिलिटरी ऑफिस आणि एअरफोर्सच्या ८९व्या एअरलिफ्ट विंगने एका स्टेटमेंटद्वारे सोमवारी संध्याकाळी सांगितलं की, “या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची पडताळणी केली जात आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प हे रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी एअरफोर्स वन लँड होत होते. त्यावेळी काळ्या आणि पिवळ्या रंगाचं एक उपकरण उडत उडत विमानाच्या अगदी जवळ आलं होतं. ते विमानाला उजव्या बाजूला धडकणार होतं, मात्र हा अपघात थोडक्यातच टळला.

नागरी ड्रोन्सचे वजन हे काही किलोग्रॅम असते आणि ते जेटलाइनर जवळ खाली उतरु शकत नाही. अशा प्रकारचे ड्रोन्स हे विमानाचे कॉकपीटच्या विंडशिल्डला नुकसान पोहोचवू शकतात किंवा संपूर्ण इंजिनचेही नुकसान करु शकतात. असं सरकारी संशोधकांचे म्हणने आहे. अमेरिकेत ड्रोन्समुळे विमानांना अडथळा होण्याच्या अनेक घटना आत्तापर्यन्त घडल्या आहेत.