“अमेरिका एक दिवशी इतिहासात जमा होईल” युद्धादरम्यान हमासचा अमेरिकेला इशारा

0
293

विदेश, दि.५ (पीसीबी): इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्ध चालूच आहे. या युद्धात अनेक नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. अशातच हमासच्या नेत्यानं अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिका एक दिवशी इतिहासात जमा होईल आणि सोव्हिएत संघासारखी फूट पडेल, असं अली बराकानं म्हटलं आहे.

अली बराकानं २ नोव्हेंबर रोजी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. अली बरका म्हणाला, “अमेरिकेच्या शत्रूंची चर्चा सुरू असून सर्वजण एकत्र येत आहेत. एक दिवशी सर्वजण अमेरिकेविरोधात युद्ध पुकारतील. त्यानंतर अमेरिका इतिहास जमा होईल.”

“उत्तर कोरियाचे नेते ( किंम जोंग उन ) हेच अमेरिकेवर हल्ला करू शकतात. अमेरिकेवर हल्ला करण्याची ताकद त्यांच्यातच आहे. उत्तर कोरिया आमच्या युतीतील एक घटक आहे. हसामचे एक शिष्टमंडळ नुकतेच मॉस्कोला गेले आहे. तर, एक शिष्टमंडळ बीजिंगलाही जाणार आहे,” असं अली बराकानं सांगितलं.

“रशिया रोज आमच्या संपर्कात आहे. हमासच्या नेत्यांनी दोहा येथे चीन आणि रशियाच्या दूतांशी चर्चा केली आहे. अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता इराणकडे नाही. इराण फक्त अमेरिकेच्या काही तळांवरच हल्ला करू शकतो. कारण, इराणकडे शस्त्रे नाहीत,” असं अली बराकानं म्हटलं.