अभिमानास्पद! ‘या’ दोन सुपरवुमन आहेत चांद्रयान-२ मोहिमेच्या शिल्पकार

0
526

बंगळुरू, दि. ७ (पीसीबी) जुलै महिन्यात २२ तारखेला दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण झालेले चांद्रयान-२ तासाभरातच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.  ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या सहाय्याने दुसऱ्या प्रयत्नात चांद्रयान २ अवकाशात झेपावले. उड्डाण यशस्वी झाल्यानंतर मजल दरमजल करत ४८ दिवसानंतर आज चांद्रयान २ हे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सज्ज झाले आहे. या मोहिमेदरम्यान एक अभिमानास्पद गोष्टही घडली, ती म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अशी चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिकांची नावे आहेत. यांपैकी वनिथा यांनी चांद्रयान-२ चे प्रोजेक्ट डायरेक्टर तर करिधल यांनी मिशन डायरेक्टर म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी आहे. यापूर्वी भारतात इस्रोच्या अतिमहत्वाच्या मोहिमेत अशा प्रकारे महिला शक्तीचा कधीही सहभाग नव्हता, त्यामुळेच पहिलांद्याच घडलेल्या या घटनेने भारतीय महिलांनी आपली हुशारी आणि ताकद जगाला दाखवून दिली आहे. झी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत त्यांचा या मोहिमेत अंत्यत महत्वाचा वाटा आहे. चांद्रयान-२च्या यशाला आणि अपयशाला त्याच कारणीभूत ठरणार होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाची ठरणारी चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी करुन दाखवला आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.