अभिनेत्री सोनाली कुलकर्णींने बजावला मतदानाचा हक्क

0
538

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मावळ आणि शिरूर मतदारसंघात  आज सोमवारी (दि. २९)  मतदान झाले. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

त्याचबरोबर मराठी अभिनेते सौरभ गोखले, भूषण प्रधान यांनी चिंचवड येथे मतदानाचा हक्क बजावला. तर आकुर्डी, काळभोरनगर येथे उद्योगपती राहुल बजाज यांनी मतदान केले.

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.  सायंकाळी ५ वाजेपर्यंत मावळमध्ये ५२.७६ टक्के, तर शिरूर मध्ये ४८ .७ टक्के मतदान झाले.

दरम्यान, मराठी अभिनेते आणि सेलेब्रिटी यांनी मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. अनेक अभिनेते, उद्योगपती यांनी मतदान केले आहे. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून अभिनेते आणि उद्योगपती यांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.