मारुतीनंतर टाटा मोटर्सही डिझेल कारला करणार अलविदा?

0
460

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मारुती सुझुकीने डिझेल कारचे उत्पादन करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता टाटा मोटर्सनेदेखील आपल्या लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्चाच्या दृष्टीने डिझेल कार महागड्या ठरणार असल्यामुळे कार उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. मारुती सुझुकीने २०२० पासून कारची विक्री बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. BS-VI एमिशन निकष लागू झाल्यानंतर डिझल कारची विक्री बंद करणार असल्याचे सांगितले होते. नव्या निकषांनुसार डिझेल इंजिन अपग्रेड करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याचे मारुती सुझुकीने स्पष्ट केले होते.