अभिजीत बिचुकलेंना अती आत्मविश्वास नडला, डिपॉझिटही जप्त

0
555

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत दंड थोपटणारे अभिजीत बिग बॉस फेम बिचुकले यांना अती आत्मविश्वास नडला आहे. अभिजीत बिचुकले यांचा पराभव झाला असून डिपॉझिटही जप्त झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने पहिले ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राष्ट्रवादी सुरेश माने यांनी उमेदवारी दिली होती. तर अभिजीत बिचुकले यांनीही आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. वरळी मतदारसंघामधून एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत.

अभिजीच बिचुकले यांना पहिल्या आठ फेऱ्यांमध्ये ३९४ मते मिळाली. तर आदित्य ठाकरे ३३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. वरळीत एकूण ५० टक्के मतदान झाले आहे. उमेदवाराला एकूण मतदानाच्या १६.६ टक्के मते मिळाली नाहीत तर डिपॉझिट जप्त केले जाते. त्याप्रमाणे अभिजीत बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी निकालाच्या दोन दिवस आधीच आपला पराभव मान्य केला होता.

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युतीला चांगले यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर युतीला किती जागा मिळणार, यात भाजपाच्या किती जागा असतील याची सर्वत्र उत्सुकता आहे. १९८५ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युकी किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली.

शिवसेनेचे मावळत्या सभागृहात ६३ आमदार होते. शिवसेनेच्या जागा वाढतात की घटतात याबाबतही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त वाढू नये, असाच भाजपचा प्रयत्न होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत होईल, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. गतवेळी काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. तेवढे यश मिळाले तरीही आघाडीसाठी समाधानकारक असेल.