अबब…कोरोना मुळे देशातील ‘इतक्या’ माजी खासदारांचे निधन

0
275

नवी दिल्ली, दि.३ (पीसीबी) – कोरोनाचे देशभरात आजही थैमान सुरू असून या साथीत अनेक रथीमहारथींना गमावले आहे. गेल्या सव्वा वर्षात कोरोनाची लागण होऊन, कोरोनातून बरे झाल्यानंतर निधन झालेल्यांची यादी पाहिली तर अनेक मंत्री, आजी-माजी खासदार आणि आमदार यांचा त्यात समावेश आहे. सुमारे ४१ माजी खासदारांची जीवनयात्रा कोरोनामुळे संपली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार अहमद पटेल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवाण, सुरेश अंगडी, केतन चव्हाण, गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सहा वेळा खासदार राहिलेले आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गगोई अशा असंख्य मान्यवरांनी कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला आहे.

माजी खासदार शहाबुद्दीन यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झाले. माजी मच्छीमार खासदार आणि समाजवादी पार्टीचे नेते रामचरित्र निषाद यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा होऊन निधन झाले. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार कमला प्रसाद रावत हे दीर्घ काळ आजारी होते, पण त्यांचेही निधन कोरोनामुळेच झाले. उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर होऊन भाजपाचे जेष्ठ प्रवक्ते मनोज मिश्रा आणि माजी खासदार रामचरित्र निषाद यांनी जगाला रामराम केला.

सपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुरेंद्र यादव यांचे गेल्याच आठवड्यात गुरुवारी रात्री सबजी मंडी येथील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह होता. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे गेल्याच महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊन निधन झाले. धारावी परिसर हे त्यांचे साम्राज्य होते.

छत्तीसगडचे बिलासपूरचे खासदार डॉ. खेल राम जांगडे यांचे शुक्रवारी दुपारी अडीच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपासून ते खूप आजारी होते. त्यांच्यावर वंदना कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार करुणा शुक्ला यांचेही वयाच्या ७० व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. शुक्लाला कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सहारनपूर भाजप नेते व माजी खासदार जगदीश राणा यांचे सोमवारी रात्री 8.15 वाजता निधन झाले. 67 वर्षीय जगदीश राणा यांचा कोविड -19 चा तपास अहवाल सकारात्मक आला होता. रांची लोहर्दगाचे माजी खासदार प्राध्यापक दुखा भगत यांचे अपघाती निधन. प्रा.भगत यांनी रिम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांनाही कोरोनाचीच लागण झाली असेही नंतर समोर आले. मध्यप्रदेशामधील खरगोन-बडवानी मतदारसंघाचे माजी खासदार आणि प्रदेशात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकशाही सेनानी रामेश्वर पाटीदार यांचेही निधन कोरोनामुळे झाले. ते पाच वेळा खासदार निधन होते.

उत्तर प्रदेश बीएएमसीईएफचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभेचे माजी खासदार बलिहारी बाबू यांचाही कोरोनामुळे अंत झाला. कानपूर मधील भारतीय जनता पक्षाचे चार वेळा खासदार असलेले श्याम बिहारी मिश्रा यांचे कोरोना संसर्गातून निधन झाले. यूपी मधील शाहजहांपूर समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि सपा सरकारमधील मंत्री असलेले माजी खासदार राममूर्ती वर्मा यांचे निधन झाले.त्यांचा मरणोत्तर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुरेंद्र पाल पाठक यांचे गेल्याच आठवड्यात मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर कोरोनाचे उपच सुरू होते. प्रयागराज मधील भाजप नेते व माजी खासदार सुरेश पासी यांचे गुरुवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. कोरोनामुळे गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

उद्योगपती आणि अलाहाबादचे माजी खासदार श्यामा चरण गुप्ता यांचे निधन झाले. होळीनंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उत्तराखंड भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कोरोना बाधित राज्यमंत्री बाचीसिंग रावत यांचे निधन कोरोनामुळे झाले अशी बातमी आहे. लखनऊमधील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य, माजी खासदार आणि माजी मंत्री भगवती सिंह यांचाही अंत कोरनामुळे झाला.

माजी खासदार रजकिशोर महतो यांचा मुलगा रजनीश यांचे श्वासोच्छवासाने निधन झाले. कोरना बाधा झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. उत्तर प्रदेशमधील बागपतचे उद्योग व्यापार प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी व्यापारी नेते आणि माजी खासदार पंडित श्याम बिहारी मिश्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. बलरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपच्या केंद्रीय शिस्त समितीचे सदस्य सत्यदेव सिंह यांचेही निधन कोरोना संसर्गातून झाले.

जयपूर, राजस्थानची राजधानी रामबाग पॅलेसचे संचालक आणि दौसाचे माजी खासदार महाराज पृथ्वीराज यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्याला कोरोना विषाणूची लागण झाली. हरियाणाचे माजी खासदार रामजीलाल यांचे गुरुवारी रात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यांना कोरोना झाला होता. मध्यप्रदेशातील खंडवाचे खासदार आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमारसिंग चौहान यांचे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात निधन झाले. गेल्या सुमारे 1 महिन्यापासून त्यांना उपचारासाठी दिल्लीत दाखल केले होते. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 11 जानेवारी रोजी भोपाळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

माजी खासदार आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचे निधन कोरोनामुळे झाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे निधन झाले.त्यांनाही कोरोनाची बाधा होती. उदयपूर सलूंबरचे माजी खासदार महावीर भगोरा यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 11 जानेवारीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवालही शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. माजी खासदार राजकिशोर महतो यांचे धनबाद खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माजी खासदार भाईलाल कोल यांचे निधन कोरोनामुळे झाल्याच्या बातम्या आल्या. गाझियाबाद माजी खासदार सुरेंद्र प्रकाश गोयल यांचे कोरोनाची बाधा होऊन निधन झाले. भाजपचे माजी नेते व माजी खासदार कैलास नारायण सारंग यांचा मृत्यू कोरोनाचे उफचार सुरू असतानाच झाला. अहमदनगरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन, ते कोरोना व्हायरस पॉझिटिव्हवर आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गुजरात गांधीनगरचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि पटना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे कोरोनाच्या साथीतच निधन झाले. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे लखनौमधील निष्ठावंत सहकारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल लाल जी. टंडन यांचे कोरनामुळे निधन झाले.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचे रविवारी वयाच्या 74 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. जून २०१९ मध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. लखनौच्या आरएमएल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कोरोना व्हायरसने माजी प्रतापगड खासदार सी.एन. सिंह यांचा मृत्यू झाला. फुलपूरचे चार वेळा खासदार असलेले रामपूजन पटेल यांचे निधन झाले.