कर्नाटकातील चामराजनगर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी २४ रुग्णांचा मृत्यू

0
339

चामराजनगर, दि.३ (पीसीबी) : कर्नाटकातील चमराजनगर येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांमध्ये कोरोना-संक्रमित २३ रुग्ण आहेत. ऑक्सिजनच्या अभावी कर्नाटकातील रूग्णालयात काही कोविड -१९ पॉझिटिव्हसह तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चमारजनगर येथील जिल्हा रूग्णालयात ही घटना घडली असून रुग्णालयात किमान १४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चामराजनगरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी मात्र रुग्णालयात ऑक्सिजन कमतरतेमुळे सर्व रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

चामराजनगर जिल्हा रूग्णालयात २४ रुग्ण ऑक्सिजन कमतरतेमुळे दगावल्याची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात निदर्शने केली आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याचा आरोप करत घोषणा दिल्या. पुरवठ्यात विलंब झाल्याने बल्लारीहून येणारे ऑक्सिजन सिलिंडर्स रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास म्हैसूर येथून एकूण सुमार २५० ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयात पोहोचले.

चामराजनगर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी डेथ ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्व २४ रुग्णांचा मृत्यू झालेला नसेल, अशी प्रतिक्रिया एस. सुरेशकुमार यांनी दिली .” दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चमारजनगरमधील घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.