…अन्यथा ९ जुलैपासून २० लाख रिक्षा चालक-मालकांचा बेमुदत बंद   

0
390

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रिक्षा चालकांच्या मागण्याचे  निवेदन देण्यात येणार आहे . ३० जून पर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व  ऑटोरिक्षा चालकांचे बेमुदत ऑटो बंद आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई येथील गोरेगावातील  केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल येथे ऑटोरिक्षा चालक – मालक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली ऑटोरिक्षा चालक -मालक -पदाधिकारी यांचा मेळावा नुकताच  संपन्न झाला. या मेळाव्यात हा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी  कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर , उपाध्यक्ष  मारुती कोंडे प्रमोद घोने, शंकर साळवी , शिलाताई डावरे, सुरेश गलांडे, ईल्यास लोधी खाण ,विजय पाटील, फिरोज  मुल्लादत्ता पाटील, मोक्षवीर लोकरे , महपती पवार , राजू शिदगणे,  संतोष शर्मा, जावेद शेख, मसूर नदाफ,  बाळा जगदाळे,  गणेश जाधव,  बेलूर स्वामी, ज्ञानेश्वर हुमणे,  आदीसह राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते   उपस्थित होते,