विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या तिघा आरोपींना अटक

0
691

चिखली, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील जनसंपर्क कार्यालयाची सस्त्रधारी हल्लेखोरांनी शुक्रवार (दि.७) तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी चिखली, भोसरी आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

सॅमसन सुलेमान अँमेन्ट (वय २०, कमांड फॅक्ट्री, खडकी), देवेंद्र रामलाल बीडलानी (वय २०, रा. आंबेडकर चौक, औंध) आणि मुकेश प्रल्हाद कांबळे (वय १९, रा. बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास सातजणांच्या टोळक्यांनी पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील जनसंपर्क कार्यालयाची हत्यारांनी तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. चिखली पोलिसांनी तातडीने घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा युनिट एक पथकासोबत तपासाला सुरुवात केली. यावेळी भोसरी पोलिसांनी सॅमसन आणि देवेंद्र या दोघांना अटक केली. त्यानंतर मुकेश याला केएसबी चौकातून अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या मित्राच्या बहिणीचे आणि दत्ता साने यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. मात्र, आरोपींच्या मित्राला हे संबंध मान्य नसल्याने त्यांनी हा हल्ला घडवून आणला. यामुळे तपासाला वेगळे वळून मिळाले असून पोलिस इतरही शक्यता तपासून पाहत आहेत.