अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
351

चाकण, दि. २९ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला.

अमर पांडुरंग दुर्गे (वय 37, रा. निगडी, प्राधिकरण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. त्यांचा भाऊ नवनाथ पांडुरंग दुर्गे (वय 35, रा. गव्हाणेवस्ती, ता. हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमर दुर्गे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / एफ एच 0249) जात होते. शेलपिंपळगाव येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये मर गंभीरपणे जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत