अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
297

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 4) पहाटे साडेतीन वाजता पाषाण तलावासमोर बेंगलोर-मुंबई महामार्गावर बावधन येथे घडला.

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आबासाहेब सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून पायी चालणा-या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.