इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात मिळवून देण्याच्या बहाण्याने पावणे तीन लाखांची फसवणूक

0
504

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) – एका महिलेने मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात मिळवून देण्याचे अमिश दाखवून नागरिकांची दोन लाख 76 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जून 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत गुलमोहर गार्डन, विजयनगर, काळेवाडी येथे घडली.

चेतन सुखदेव पंचभाई (वय 38, रा. गुलमोहर गार्डन, विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 26 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी आणि अन्य लोकांना मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत मिळणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी आणि अन्य लोकांकडून दोन लाख 76 हजार 500 रुपये घेतले. लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत न देता तसेच त्यांचे पैसे परत न देता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करीत आहेत.