अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरूवारी चिंचवडमध्ये गौरव होणार

0
496

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – एस्सेन ग्रुप ऐश्वर्यम ब्रँडचे चेअरमन भीमसेन अग्रवाल व वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रेमचंद्र अग्रवाल यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी अग्रवाल समाजाच्या गुणवंत व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरूवारी (दि. ३०) चिंचवड येथील अग्रसेन समाज भवन येथे होणार आहे.

सांयकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या माध्यमिक-उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच ग्रॅजुएट व पोस्ट ग्रॅजुएट, मेडिकल, इंजीनियरिंग परीक्षा आणि अन्य डिग्री डिप्लोमा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या अग्रवाल समाजाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी 9673988770, 9822836056, 7020316009,7020206284 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन भीमसेन अग्रवाल आणि प्रेमचंद्र अग्रवाल यांनी केले आहे. तसेच या गुणगौरव सोहळ्यात भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर अशोक अग्रवाल यांनी दिली.