अखेर राधाकृष्ण विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

0
494

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अखेर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. विखे यांचा  राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे,  अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (गुरूवार) येथे दिली.   

अहमदनगर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे जागा सोडण्याची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर त्यांनी   भाजपमध्ये प्रवेश केला होता.  भाजपने त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुजय याच्या  भाजप प्रवेशामुळे  राधाकृष्ण विखे पाटील यांची कोंडी झाली होती.

त्यामुळे विखे-पाटील  विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर त्यांनी आज आपला राजीनामा दिला आहे. राजीनाम्यावरून नगरमधील  काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विखे-पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता.