महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन !

186

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय हि एक अध्यात्मिक संस्था असून विविध विषयांवर संशोधनाचे कार्य करते तसेच सामाजिक जाणीव जोपासली जावी या करीता संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.यामध्ये प्रथमोपचार शिबीर,शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप,आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रम नियमित घेतले जातात.

या संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वल्लभनगर येथील एच ए स्कूल, पिंपरी, पुणे येथे 19 जानेवारी या दिवशी शिक्षकांसाठी तर एच ए स्कुल, (माध्यमिक विभाग), पिंपरी पुणे येथील मुलांसाठी 13 जानेवारी या दिवशी योग शिबीर घेण्यात आले. यामध्ये नियमित योगासने करण्याचे फायदे मुलांना सांगितले आणि प्रात्यक्षिके करून दाखविली.
तसेच श्रद्धा गार्डन मोरे वस्ती येथील स्वस्तिक बालविकास सेवा अंगणवाडी येथील मुलांसाठी 19 जानेवारी या दिवशी खाऊ वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.शारदा सोनवणे, सौ. हेमलता म्हात्रे , सौ. शालीनी चिंचोळकर यांनी आयोजनात सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.