काश्मीर दौऱ्यावरून राहुल गांधीवर मायावती भडकल्या

0
453

लखनऊ, दि. २६ (पीसीबी) – राहुल गांधी यांच्या काश्मीर दौयावरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती चांगल्याच भडकल्या आहेत. त्या म्हणाल्या कलम ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल. कलम ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल. पण राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेला हा दौरा म्हणजे भाजपला राजकारण करण्याची संधी दिल्यासारखेच असल्याची टीका मायावती यांनी केली.

तणाव टाळण्यासाठी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे सांगताना मायावती म्हणाल्या जम्मू काश्मीरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. हा दौरा म्हणजे भाजपाला राजकारणासाठी आयत कोलीत दिल्यासारखाच आहे, असे म्हणत मायावती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षातील नेत्यांसह काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. पण, त्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आले. मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच देशाच्या समता, एकात्मता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांनी कलम ३७० ची तरतूद करण्याच्या विरोधात होते. याच कारणामुळे बसपाने हे कलम हटवण्याचे समर्थन केले आहे. देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या ६९ वर्षांनंतर कलम ३७० हटवण्यात आले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. त्यामुळे प्रतीक्षा करायला हवी.