काँँग्रेस स्टार प्रचारकांमध्ये नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांसह कुमार केतकर

0
327

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदार संघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तर यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत.

या स्टार प्रचारकांमध्ये, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री आमदार. डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार कुमार केतकर, खासदार इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्याही स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादीने एकूण २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख विद्या चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , खासदार सुप्रिया सुळे, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके , पक्षाचे पदाधिकारी शेख सुभान अली हे स्टार प्रचारक आहेत.