राष्ट्रवादीच्या बंदला भाजप समर्थकांचा असहकार

0
720
पिंपरी बाजारपेठेत बंद काळात सुरू असलेली दुकाने

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिखर बँकेच्या कथित गैरव्यवहराप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर  बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या बंदला भाजप समर्थकांनी न जुमानता आपले व्यावसाय सुरूच ठेवल्याचे शहराच्या विविध भागात पहायला मिळाले. दरम्यान, हा बंद दुपारी दोनपर्यंत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.  

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी (दि. २६) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केल्यानंतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शुकवारी शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या बंद पिंपरी कॅम्प, काळेवाडी, नेहरूनगर, पिंपळे सौदागर, सांगवी,  पिंपरी बाजार पेठेत अनेक व्यावसायिकांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. मात्र, याच परिसरातील भाजप समर्थक व्यावसायिकांनी बंदला असहकार करत आपली दुकाने सुरू ठेवली.

पुर्वी राष्ट्रवादीत असलेल्या व आता भाजपात प्रवेश केलेल्या पिंपरी कॅम्पातील एका पदाधिकाऱ्याने आपली दुकाने सुरूच ठेवली. काळेवाडीतही नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे व नगरसेविका उषा काळे यांनी बंदचे आवाहन केले होते.  त्यामुळे पुष्पळ व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. मात्र, अनेकांनी बंदला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, राज्यात आचारसंहिता सुरू असून विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहराच्या विविध भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.