महिलांविषयक कायद्यांची जनजागृती महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त – विजया रहाटकर

0
522

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – महिला बचत गटांना महिलांविषयक कायदयांची जनजागृती करण्याकरीता आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिर त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त आहे. असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजनेचे दुसरे प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

बुधवारी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, माई ढोरे, आरती चोंधे, सुनिता तापकीर, झामाबाई बारणे, सविता खुळे, चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, नगरसदस्य नामदेव ढाके, सागर आंगोळकर, राजू बनसोडे, चंद्रकांत नखाते, हर्षल ढोरे, माजी नगरसदस्य उमा खापरे, राजेंद्र राजापुरे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

यावेळी रहाटकर म्हणाल्या, महिला ही कुटूंबासाठी सतत झटत असते, घरासाठी त्याग करत असते, ती घराची आधारस्तंभ असते. सर्व महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येवून स्वताच्या पायावर उभे राहायला पाहिजे. बचत गटांनी कल्पकतेने आपले काम केले पाहिजे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बचत गटाच्या योजनांची त्यांनी माहिती दिली.

आमदार जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड ही श्रमिकांची नगरी आहे. काही कुटूंबांना प्रपंचाचा गाडा एका माणसाला हाकावा लागतो, त्यामुळे अशा कुटूंबाला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परीस्थितीत महिलांनी हातभार लावला पाहिजे. शहरातील बचत गट अनुदानापर्यंत जातात परंतू पुढे ते काम थांबवतात. दरवर्षी महापालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बचत गटांनी डिजीटल साधनांचा अवलंब केला पाहिजे. खरेदी विक्री करताना स्वॅप मशिन किंवा ऍपचा वापर मोठया प्रमाणात केला पाहिजे. तसेच बचत गटांचे आर्थिक व्यवहार व लेखे व्यवस्थित जतन करुन ठेवणे गरजेचे आहे. त्याचा फायदा व्यावसाय वाढीसाठी व बँकांकडून कर्ज उभारणीस मदत मिळू शकते.

प्रास्ताविक उमा खापरे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी मानले.