मुंबई, दि.२१ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकताच त्याचा ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून हा चित्रपट करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. मात्र सलमानने चित्रपटाचे राहिलेले शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. त्यानंतर सलमानने त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. नुकताच आपल्या ट्विटर अकाउंट वर चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे.
Antim begins..#AntimFirstLook – https://t.co/4VWQwDpsmJ#AayushSharma @manjrekarmahesh @SKFilmsOfficial
— Salman Khan (@BeingSalmanKhan) December 21, 2020
अभिनेता आयुष शर्मा देखील सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असून या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.