का झाली कॉमेडियन भारती सिंह पुन्हा ट्रोल….?

0
245

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर भारतीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा देखील करावा लागला होता. आता पुन्हा सोशल मीडियावर भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवरुन भारतीला पुन्हा ट्रोल करण्यात आले आहे.

या व्हिडीओमध्ये भारती गाडीमध्ये बसली आहे. तिने मास्क घातले आहे. दरम्यान ती हातावर सॅनिटायझर घेते आणि हाताला चोळते. सॅनिटायझर कसे वापरायचे हे भारती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन भारतीला ट्रोल करण्यात आले आहे. एका यूजरने तर हे सॅनिटायझर आहे, ड्रग्ज नाही असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.

ड्रुग्स प्रकरणी चाललेल्या चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची जामीनावर सुटका झाली.