परवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह सिध्दू

0
1136

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) –  पाकिस्तानचे नुतन पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यानंतर वादात अडकलेले पंजाबचे मंत्री  नवज्योतसिंह सिध्दू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचे समर्थन केले आहे. मी परवानगी घेऊन पाकिस्तानमध्ये गेलो होतो. देशाचा कोणताही नियम तोडलेला नाही, असे सिध्दू यांनी  म्हटले आहे.

कुणी तुम्हाला येऊन भेटत असेल आणि म्हणत असेल की आपण समान संस्कृतीशी एकबद्ध आहोत. आम्ही गुरु नानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने करतापूर बॉर्डर खुली ठेवू,  असे ते म्हणत असतील तर मी काय करायला पाहिजे, असे सिद्धू म्हणाले.

इस्लामाबादमध्ये शपथविधी सोहळ्यात आझाद काश्मीर प्रांताचे  प्रमुख मसूद खान यांच्याशेजारी सिध्दू यांना बसण्यासाठी जागा दिली  होती. त्यावरही सिद्धू यांनी  खुलासा केला आहे. मी तिथे एक सन्मानित अतिथी असल्याने जिथे  बसायला सांगितले तिथे बसलो. मी अगोदर दुसरीकडे बसलो होतो, मात्र त्यांनी मला नंतर तिथे (मसूद खान) बसायला सांगितले म्हणून बसलो, असे सिद्धू यांनी सांगितले.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणे चुकीचे आहे. आपले जवान दररोज शहीद होत आहेत हे अगोदर समजून घ्यायला हवे, असू सांगून नाराजी व्यक्त केली.