‘खडसे यांचे ठरले… जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश’

0
244

जळगाव,दि.२१(पीसीबी)- भाजपचे नाराज नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हो, नाही करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एक बहुजन समाजातील नेता पक्ष सोडून जात असल्याने भाजपसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

मुंबई येथे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. खडसे यांच्या प्रवेशाचा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला दिल्याचे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविभैय्या पाटील यांनी आज काही माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांची भरपूर मनधरणी केली, पण अखेर त्यात त्यांना अपयश आले आहे, असे सांगण्यात आले.