अण्णा हजारेंकडून शरद पवारांची पाठराखण

0
667

अहमदनगर, दि. २६ (पीसीबी) – राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांची पाठराखण केली आहे.     

हजारे आज (गुरूवार) राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात आपल्याकडे असलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे.

या प्रकारणात शरद पवारांचे नाव कसे आले आहे, मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, असेही हजारे यांनी म्हटले आहे.