काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता

0
332

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन आज (मंगळवार) फेटाळून लावला. त्यामुळे सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. यानंतर चिदंबरम यांनी  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास ईडी आणि सीबीआयने विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे, असे  ईडी आणि सीबीआयने  न्यायालयात म्हटले होते.

२००७ मध्ये आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५  कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे.  त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचा मुलगा  कार्ती यांना अटक केली होती.