काँग्रेस नेते आझाद यांना दुसऱ्यांदा जम्मू विमानतळावर ताब्यात घेऊन दिल्लीला पाठवल

0
441

जम्मू, दि. २० (पीसीबी) – काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना आज (मंगळवार) दुपारी दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल. जम्मू विमानतळावर उतरताच आझाद यांना ताब्यात घेऊन पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.

राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते असणारे गुलाम नबी आझाद यांना याआधी आठ ऑगस्टला श्रीनगर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. आज ते पुन्हा जम्मू प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन दिल्लीला रवाना करण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत. कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला गुलाम नबी आझाद यांचा विरोध असून संसदेत त्यांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली होती. यामुळे त्यांच्यावर हि कारवाई केल्याचे बोलले जात आहे.