सातारा, दि. १० (पीसीबी) – सर्वांनी एकी ठेवून संकटावर सगळे एकत्र मिळून मात करू. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस संकटावर एकजुटीने मात करतो हे जगाला दाखवून देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) सांगितले.
शरद पवार यांनी सातारा जिल्हयातील कराड – तांबवे गावाला भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा केली. तुमच्या सर्वाच्या पाठिशी राहू, असे सांगून दिलासा दिला.
एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची ताकद एकट्या दुकटयाची नाही. राज्य आणि केंद्र सरकार मदतीला धावून यायला हवे. विविध संस्था, व्यक्तींनी मदतीचा हातभार लावायला हवा. तसेच राज्य व केंद्राकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.