पारनेरमध्ये शेततळ्यात बुडून तिघा भावांचा दुर्देवी मृत्यू

0
459

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील शेततळ्यात बुडून तीन सख्ख्या चुलतभावांचा दुर्देवी मृत्यू झाला.

इस्माईल बालम शेख (वय २०), नावेद नुरम्हमद शेख (वय १६) आणि मोईन निजाम शेख (वय १४) असे मृत तिघा भावांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ढवळपुरी येथील शेततळ्यात इस्माईल, नावेद आणि मोईन हे तिघे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे तिघे ही सख्खे चुलत भाऊ आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारनेर पोलीस अधिक तपास करत आहेत.