उस्मानाबादच्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व संभाजी राजेंकडे

0
658

किल्ले रायगड, दि.७ (पीसीबी) – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी घोषणा, डौलाने फडकणारे भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर अशा भारावलेल्या वातावरणात गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला.

यावर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे, युवराज शहाजीराजे यांच्यासोबत  उस्मानाबाद जिल्ह्यातील मेडसिंगा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनाही देण्यात आला. या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देतानाच संभाजी राजेंनी या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारीही स्वीकारली.