राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशावर राम शिंदें म्हणतात…    

0
526

अहमदनगर , दि. २६ (पीसीबी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सुजय विखे वडिलांना भाजपमध्ये आणणार,  असे सांगत आहेत. आता पालकमंत्री म्हणून मी पाहणार आहे की, अशोक चव्हाण आणि सुजय विखेंमध्ये कोण जास्त प्रयत्न करणार, असे राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी म्हटले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी  आज (शुक्रवार) श्रीरामपूर शहरात आयोजित सभेत शिंदे बोलत होते.

यावेळी  राम शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा  राजीनामा मंजूर झाला आहे. ते कुठं जाणार हे तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते विखे पाटलांचे मन वळववण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला विखेंचे पुत्र सुजय विखे म्हणत आहेत की, मी वडिलांना भाजपात आणणार, असे शिंदे यांनी सांगून विखेंच्या भाजपप्रवेशाचे संकेत दिले.