सनी देओल फिल्मी फौजी, पण मी खरा फौजी – कॅप्टन अमरिंदर सिंग

0
622

चंदीगढ, दि. २६ (पीसीबी) – भाजपने गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अभिनेते  सनी देओल फिल्मी फौजी आहेत. पण मी खरा फौजी आहे. आम्ही त्यांचा पराभव करु. गुरुदासपूरमधून काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या सुनील जाखर यांना किंवा काँग्रेसला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही,  असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत सनी देओलचा आम्ही अत्यंत सहजपणे पराभव करु, असा विश्वास अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे. सनी देओल फिल्मी फौजी आहे, मात्र मी खरा फौजी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  सनी देओल यांनी नुकताच भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना लगेच गुरुदासपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपप्रवेशावर बोलताना सनी देओल  म्हणाले होते  की,  ज्याप्रकारे माझे वडील धर्मेंद्र यांचे माजी पंतप्रधान अटलजी यांच्याशी चांगले नाते होते. त्याप्रकारे मी आज मोदींना साथ देण्यासाठी आलो आहे. भाजप कुटुंब असून त्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करणार. मी जे काही करणार आहे ते बोलणार नाही, माझ्या कामातून दाखवून देणार, असे त्यांनी म्हटले होते.