पंतप्रधान मोदी ‘या’ लोकसभा मतदारासंघातून निवडणूक लढवणार  

0
408

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, मोदींच्या उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजप वयाचा निकष लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, उमेदवाराच्या विजयाची खात्री हा एकमेव निकष भाजप लावणार आहे. त्यामुळे वय झाले तरी, रिझल्ट देणाऱ्या उमेदवारलाच लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहे.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गुजरातमधील बडोदा अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.  बडोद्याची जागा मोदींनी ५ लाख ७० हजार १२८ मतांच्या फरकाने जिंकली होती, तर वाराणसीतून ३ लाख ७१ हजार ७८४ च्या मताधिक्याने मोदींनी ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.