पुणे विमानतळावरुन सव्वा कोटींचे सोने जप्त

0
1003

पुणे, दि. १० (पीसीबी) – दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून सुमारे ४ किलो सोन्याचे बिस्कट जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई कस्टम अधिकार्‍यांनी केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल १ कोटी २९ लाख ४ हजार रुपये इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून निघालेले स्पाईस जेट विमान (एसजी ५२) हे आज गुरुवार पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे विमानतळावर आले होते. पुण्याहून ते बंगलुरुला जाणार होते. कस्टम अधिकारी तपासणी करीत असताना विमानातील टॉयलेटमध्ये काळ्या टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले हे चार सोन्याचे चार बिस्कट आढळून आले. त्यावर परदेशी मार्क आहेत. कस्टम पथकाने हे सोने जप्त केले आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.