पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे.
25 सप्टेंबर सकाळी 6 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 41 तास मेट्रो सेवा एकही मोठा खंड न घेता सलग सुरू राहणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मध्य पुण्यात येणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी 14 ते 26 सप्टेंबरदरम्यान मेट्रोचे विशेष वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान सेवा सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत, तर 17 ते 24 सप्टेंबरदरम्यान सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.
यासोबतच PCMC–Swargate आणि Vanaz–Ramwadi या दोन्ही मार्गांवर peak hours मध्ये दर 5 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत असलेले सहा मिनिटांचे अंतर कमी करून पाच मिनिटे करण्यात येणार असल

