तर विद्यापीठे कालबाह्य ठरतील…
पारंपरिक उच्च शिक्षणासमोर AI हे आजवर पाहिलेले सर्वात मोठे अस्तित्त्त्वाचे संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठांनी केवळ विद्यार्थ्यांच्या डोक्यात ज्ञान कोंबण्याचे काम सुरू ठेवल्यास ती कालबाह्य ठरण्याचा धोका निर्माण होईल. विद्यापीठांनी AI शी स्पर्धा न करता मानवी सहकार्य, सहानुभूती आणि सर्जनशीलता यांसारख्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आजकालचे विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्राध्यापकांपेक्षा अधिक कुशल असून ते झटपट उत्तरे शोधू शकतात. विद्यापीठांनी केवळ जुन्या पद्धतींचा अवलंब न करता काळाच्या ओघात स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून आणणे अनिवार्य आहे.
ब्रायन रोसेनबर्ग
व्हिजिटिंग प्रोफेसर, हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन

