नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराला सात दिवस उलटले असून परिस्थिती अजूनही गंभीर आहे. या आपत्तीत आतापर्यंत ३३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ४ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमधील महापुराने मोठी जीवितहानी केली आहे. सातव्या दिवशीही बेपत्ता नागरिकांचा शोध आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

