३१ मिनिटे ४५ सेकंदांत ७६३ पक्षी ओळखणाऱ्या पुण्यातील ८ वर्षीय अर्पित चौधरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

bpcauthor
1 Min Read

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथील इयत्ता तिसरीत शिकणारा अर्पित अक्षय चौधरी (जन्म : ५ एप्रिल २०१८) याने “Maximum Birds Identified by a Child” या प्रकारात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवला आहे.

अर्पितने मोठ्या टीव्ही स्क्रीनवर दाखविण्यात आलेल्या भारत आणि जगभरातील ७६३ पक्ष्यांची छायाचित्रे अवघ्या ३१ मिनिटे ४५ सेकंदांत अचूक ओळखून त्यांची नावे सांगत हा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची अधिकृत नोंद २५ जून २०२६ रोजी करण्यात आली.

लहानपणापासूनच अर्पितला पक्षीनिरीक्षण, निसर्ग आणि जैवविविधतेची विशेष आवड आहे. सध्या तो भारत आणि जगभरातील १,१०० हून अधिक पक्षी प्रजाती अचूक ओळखू शकतो. यापूर्वी त्याला ३८ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात “यंग बर्डर अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले आहे. तो Bombay Natural History Society (BNHS) चा सदस्य असून विविध पक्षीनिरीक्षण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतो.

अर्पितचा उद्देश केवळ विक्रम करणे नसून अधिकाधिक मुलांना पक्षीनिरीक्षण, निसर्ग संवर्धन आणि नागरिक विज्ञान (Citizen Science) याची आवड निर्माण करणे हा आहे. भविष्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी तो सातत्याने तयारी करत आहे.

विक्रम प्रयत्नाचा व्हिडिओ, उत्तरपत्रिका तसेच छायाचित्रे येथे उपलब्ध आहेत:
“https://drive.google.com/drive/folders/1Uy3nRu-aa-H5WJ3UbtaUiRt5RtkcrSQE?usp=drive_link” (https://drive.google.com/drive/folders/1Uy3nRu-aa-H5WJ3UbtaUiRt5RtkcrSQE?usp=drive_link)

Share This Article