पिंपरी विधानसभेत आमदार अमित गोरखे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

bpcauthor
3 Min Read

भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; समाजोपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक
पिंपरी, दि. २० महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार श्री. अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथील नोवेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मा. श्री. रवींद्रजी चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आहे. रक्तदानासारख्या उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी मतदारसंघात आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकी जपणारे आणि तरुणांना सेवाभावाची प्रेरणा देणारे आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो आणि सार्वजनिक जीवनातील लोकप्रतिनिधींनी समाजहिताला प्राधान्य दिल्याचे समाधान वाटते.”

सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी भाजप प्रदेश महामंत्री मा. श्री. राजेशजी पांडे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार मा. श्री. निरंजन डावखरे, आमदार मा. श्री. शंकर जगताप, आमदार श्रीमती उमाताई खापरे, उपमहापौर सौ शर्मिला बाबर, मा. श्री. राजेश पिल्ले, सभापती श्री. संजय नाना काटे, सभापती श्री. कैलास कुटे, नगरसेवक श्री. तुषार हिंगे, नगरसेवक श्री. शीतल शिंदे, नगरसेवक श्री. कुशाग्र कदम, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, नगरसेविका सौ. सुप्रिया चांदगुडे, नगरसेविका सौ. शैलजा मोरे, नगरसेविका सौ. मधुरा शिंदे, श्री. प्रसाद शेट्टी, श्री. अमित बाबर, श्री. नेताजी शिंदे तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे भव्य रक्तदान शिबिर सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उत्साहात पार पडले. शिबिराला नागरिकांचा, विशेषतः युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. मोठ्या प्रमाणात झालेल्या सहभागामुळे हे शिबिर पिंपरी-चिंचवड शहरातील उल्लेखनीय आणि भव्य रक्तदान उपक्रमांपैकी एक ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अमित गोरखे यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ७ प्रभागांमध्ये अशाच प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले,तसेच नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत, समाजहितासाठी अशा उपक्रमांची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला…

Share This Article