थेरगाव व पिंपरी चिंचवडची ओळख जगतिक पातळीवर नेणार – विश्वजित बारणे

bpcauthor
1 Min Read

दि.०२(पीसीबी)-श्री. विश्वजीत दादा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व थेरगाव शिवसेना विभागप्रमुख श्री. आकाश दत्तात्रय बारणे यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड सर व शाळेतील शिक्षक वर्ग ,मा.सचिन सुतार, मा.बाबन बेरड, मा.भीमाशंकर भोसले (पोलीस हवालदार काळेवाडी पोलिस स्टेशन) मा. साजिद भाई मुल्ला, मा.विजय जी नेवासे ( कार्यवाहक थेरगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मा. अक्षय कांबळे, मा. अक्षय बारणे,मा. सागर बारणे ,मा. प्रसाद केसरे, मा. शंकर खलसे , मा. खंडू पारधे , मा. आर्य शेवाळे मा. कार्तिक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय मुख्याध्यापक राठोड सर यांनी त्यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत मध्ये शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून शाळे ला गौरव प्राप्त करून दिला आहे.. शाळेने मागील कालखंडामध्ये विविध बक्षीस देखील प्राप्त केले आहेत चित्रकला स्पर्धा drawing Creative work करून त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात आलं तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन च्या वतीने शाळेमध्ये पिण्यासाठी मुबलक पाणी मिळवण्यासाठी वॉटर प्युरिफायर वॉटर फिल्टर तसेच कॅम्पुटर लॅब करण्याबाबत ग्वाही नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी दिली,तसेच थेरगाव व पिंपरी चिंचवडची ओळख जगतिक पातळीवर नेण्याचे आवाहन नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Share This Article