आप चे सात खासदार भाजपमध्ये, अरविंद केंजरीवाल यांना मोठा धक्का

1 Min Read

दि.२४(पीसीबी)-आम आदमी पार्टी (AAP) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभा सदस्य खासदार राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखालील ७ खासदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे सदस्य ‘आप’च्या एकूण १० खासदारांपैकी २/३ सदस्य असल्याचे सांगत, त्यांनी भाजपमध्ये विलीनीकरण केले.

भाजपमध्ये सामील झालेले मुख्य ७ खासदारांत राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल , स्वाती मालीवाल, हरभजन सिंग,
विक्रमजीत सिंग साहनी, राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.पक्षांतरासाठी २/३ सदस्यांनी पक्ष सोडणे गरजेचे असते आणि १० पैकी ७ खासदारांनी आप ला सडचिठ्ठी दिल्याने हे पक्षांतर कायदेशीर मानले जात आहे. राघव चढ्ढा यांनी ‘आप’ने मूळ तत्त्वांपासून (इमानदार राजकारण) भटकल्याचा आरोप केला आहे.
पंजाब आणि दिल्लीतील आप पक्षासाठी हा मोठा फटका आहे. यातील अनेक खासदार पंजाबचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा आपसाठी मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे.

Share This Article