ऋषिकेश वैद्य ची शेंडी कापू नका – न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

0
3

दि.०७(पीसीबी)-एकीकडे नाशिकमधील भोंदु अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे वसईतील आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच तो पसार झाला. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे.

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर न्यायालयाने दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी अजब मागणी केली होती. तुरुंगामध्ये वैद्य याचे केशवपन करू नये, अशी मागणी वैद्यच्या वकिलांनी केली होती, त्या मागणीबाबत पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश दिले आहेत, त्यामध्ये भोंदू ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये असं म्हटलं आहे.
भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात वैद्यची शेंडी कापू नये असे आदेश पुणे न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. दैविशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून वैद्य यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यामुळे वैद्य याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. यावेळी वैद्य याच्या वकिलांनी वैद्य यांच्या डोक्यावरील शेंडी ही धार्मिक बाब आहे ती कापू नये अशी विनंती केली, याबाबत अर्ज केल्यांनंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.