इराण युद्धाचा परिणाम भारतात कंडोमचे शॉर्टेज किंमत वाढणार, वापर घटणार..

1 Min Read

दि.०७(पीसीबी)-इराणमधील युद्धाचा अनेक उद्योगांना फटका बसला आहे. आता त्याचा परिणाम लाइफस्टाइलशी संबंधित असलेल्या कंडोम उद्योगावरही दिसून येत आहे. त्यामुळे या उद्योगात अस्वस्थता आणि चिंता निर्माण झाली आहे. ८ हजार कोटींचा हा उद्याग अडचणीत आला आहे.कंडोम बनवण्यासाठी लागणाऱ्या पेट्रो-केमिकल वस्तू, अमोनिया आणि सिलिकॉन ऑइल यांच्या पुरवठ्यात अडथळे आले आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. याचा परिणाम बाजारातील किरकोळ विक्रीवरही होऊ शकतो.

या उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या या उद्योगात पुरवठादारांकडून अमोनियाच्या किमतीमध्ये ४० ते ५० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सिलिकॉन ऑइलच्या किमतीही वाढू शकतात.
या उद्योगाशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “या उद्योगाला अडचण येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. कारण कंडोम आता लाइफस्टाइलचा भाग बनला आहे. त्याच्या व्यापाराचा लोकांवर परिणाम होत आहे.”
लेटेक्स टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यातील जास्त प्रोटीन काढण्यासाठी अमोनियाचा वापर केला जातो. तर सिलिकॉन ऑइलचे कोटिंग कंडोमवर लावले जाते, जे लुब्रिकंटसारखं (वंगण) काम करतं. परंतु, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि त्याचा किरकोळ विक्रीवर होणारा परिणाम हेच एकमेव चिंतेचं कारण नाही.
या उद्योगातील या अडचणीचा परिणाम लोकसंख्या आणि आरोग्याशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठीही (कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि एड्स नियंत्रण कार्यक्रम) चिंतेचा विषय बनला आहे.

Share This Article