दि.०६(पीसीबी)-पाच वर्षापासून रखडलेल्या आणि तीन वेळा मुदतवाढ देऊनही ७० टक्केच पुर्ण झालेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे उर्वरित कामही पुर्वीच्याच ठेकेदाराकडून करून घेण्याच्या चर्चा सध्या पालिकेत सुरू आहे. तत्कालीन आयुक्तांनी या ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नवीन निविदा प्रक्रिया केल्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागू शकेल. म्हणून जून्याच ठेकेदाराला काम देण्याचा हालचाली चालू आहेत.
पिंपरी चिचंवड शहराला सध्या मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असलेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम रखडलेले आहे. सद्यःस्थितीत ७० टक्के काम पुर्ण झाले असून, ३० टक्के काम बाकी आहे. मुदतवाढ देऊनही काम पुर्ण न झाल्याने तत्कालीन आयुक्त-मा.श्रावण हर्डीकर यांनी संबंधीत ठेकेदाराला बडतर्फ केले आहे.
उपरोक्त कामासाठी बडतर्फ केलेल्या पुर्वीच्याच ठेकेदाराला काम न देता, अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून एक महिन्याच्या आंत नवीन ठेकेदाराची नेमणूक करून सदरचे काम देणेत यावे,अशी मागणी शिवसेना नेत्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली होती.








































