पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे फेब्रुवारी २०२६ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण २६ जण सेवानिवृत्त…

0
3

सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांची जबाबदारीने काम करण्याची पध्दत,सेवाभाव व आठवणी कायम स्मरणात राहतील – उपमहापौर शर्मिला बाबर

शहर अभियंता मकरंद निकम अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त….सेवा शिल्लक असताना त्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती…

अधिकारी आणि कर्मचारी कालपर्यंत कार्यरत..

पिंपरी, दि. १ मार्च २०२६ :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे महापालिकेतील सहकारी अधिकारी,कर्मचारी हे त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणींमुळे कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात माहे फेब्रुवारी २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १८ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ८ अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना उपमहापौर बाबर या बोलत होत्या.

 या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत,सह शहर अभियंता सुनिल भागवानी, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

 माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, कार्यालयीन अधिक्षक अनिता बाविस्कर, मनीष जगताप, लेखापाल तानाजी सावंत, मुख्य लिपिक चांगदेव खुने, सिस्टर इन्चार्ज जयश्री दाभाडे, नर्स मिडवाईफ सुजाता धवन, प्लंबर दिलीप गायकवाड, वायरमन रमेश थोरात, मुकादम राजेश कोटरवार, शांताराम तळपे, शिपाई कैलास वाघेरे, जितेंद्र मोरे, रखवालदार दत्तात्रय घुले, मजूर बाळू काळभोर, बलभीम कांबळे, पोपट भांगरे, आया सुमन तांबे यांचा समावेश आहे.

 तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये शहर अभियंता मकरंद निकम, उप शिक्षक बापूराव गिरमे, वीजतंत्री ज्ञानेश्वर ताम्हाणे, सफाई कामगार नयना कामठे, अनिल टाक, सुनिता शिंदे, गणेश भंडारी, गटरकुली धोंडीबा गायकवाड, यांचा समावेश आहे.

 महापालिका सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे इतर महापालिकांची परिस्थिती पाहता खूप भाग्यवान आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेळेत पगार तर मिळतोच शिवाय इतर सोईसुविधा देखील मिळतात असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले शिवाय सेवानिवृत्त कर्मचा-यांनी  महापालिकेकडून सेवानिवृत्तीच्या नंतर मिळालेल्या रकमेचे व्यवस्थित नियोजन करून आनंदी जीवन जगावे असेही ते म्हणाले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.