लढायाई मुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0
3

मध्य पूर्वेतील काही भागांमधील सध्याच्या परिस्थितीचा हवाला देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएई मध्ये २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

विद्यार्थी आणि शाळांना कळविण्यात येते की मध्य पूर्वेतील काही भागांमधील (बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएई) सध्याच्या परिस्थितीमुळे बोर्डाने सोमवार, २ मार्च रोजी होणाऱ्या मध्य पूर्व प्रदेशात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं केंद्रीय मंडळाने एका निवेदनात म्हटलं आहे.

बोर्ड मंगळवार, ३ मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेईल आणि ५ मार्चपासून होणाऱ्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेईल. तसंच, सीबीएसईने सर्व विद्यार्थ्यांना अपडेट्ससाठी त्यांच्या शाळांच्या संपर्कात राहण्याचा आणि अधिकृत घोषणांचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला दिला आहे.