पिंपरी, दि. 25 :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आज बुधवारी त्यांचा अधिकृत अर्ज नगरसचिव विभागाकडे सादर करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात होणार आहे.
या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका या कामकाज पाहणार आहेत. संबंधित नियमांनुसार निवड प्रक्रिया त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यावेळी अभिषेक बारणे यांची अधिकृत निवड जाहिर करण्यात येणार आहे.
