सुहास दिवसे यांची बदली

1 Min Read

मुंबई, दि. २५ : राज्यातील दोन बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जारी करण्यात आला आहे. डॉ. सुहास दिवसे आणि शैलेश नवाल यांची बदली करण्यात आली आहे.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात दुसऱ्यांदा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
कुठून कुठे बदली?

१. डॉ. सुहास दिवसे कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची यशदा, पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२. शैलेश नवाल केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आणि सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
-सुहास दिवसे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांच्याकडे भूमी अभिलेखच्या संचालकपदाची जबाबदारी दिली.
-शैलेश नवाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्यावर आता भूमी अभिलेखच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Share This Article